PMEGP कर्ज अनुदान योजना | पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (५० लाख कर्ज आणि १७.५० लाख रु पर्यंत अनुदान )

PMEGP Scheme

PMEGP कर्ज अनुदान योजना | PMEGP loan Subsidy Scheme

PMEGP loan Scheme म्हणजेच पंतप्रधान ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम (Prime Minister’s Employment Generation Programme) हि योजना एप्रिल २००८ साली सुरु झाली.
    PMEGP scheme अंतर्गत कर्ज योजना सुक्ष्म, लहान व मध्यम उद्योग मंत्रालय आणि खादी ग्रामोद्योग आयोग, खादी ग्रामोद्योग बोर्ड या कार्यालयामार्फत ग्रामीण भागामध्ये व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत शहरी व ग्रामीण भागात केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यांच्या हाताला काम मिळावे. स्वतःचा उद्योग करता यावा, यासाठी नाममात्र व्याजदरावर कर्ज देण्याचे काम ही योजना करते.

महत्त्वाचे मुद्दे | Table of Contents

PMEGP योजनेचे उद्दिष्ट | PMEGP loan Scheme Purpose

  • स्वयं रोजगाराच्या नव्या उद्योगांमार्फत/परियोजनातून/सूक्ष्म उद्योगाच्या माध्यमातून देशातील शहरी क्षेत्रांबरोबरच ग्रामीण क्षेत्रात देखील रोजगाराची हमी देणे.
  • पारंपारिक/ ग्रामीण आणि शहरी कारागीरांना व बेरोजगार तरुणांना व्यापक स्वरुपात एकत्र आणणे आणि त्यांना यथासंभव त्यांच्या जागेतच स्वयंरोजगार मिळवून देणे.
  • पारंपारिक/ग्रामीण आणि शहरी कारागीरांना व बेरोजगार तरुणांना कायमस्वरुपी आणि टिकाऊ असा स्वयंरोजगार देणे, जेणेकरुन त्या गावातील तरुण लोक शहराकडे जाणे टाळतील.
  • पारंपारिक कामगारांची पैसे मिळविण्याची क्षमता वाढविणे. तसेच ग्रामीण आणि शहरातील बेरोजगारांची संख्या कमी करणे, त्यांच्या विकासाला चालना देणे.

PMEGP योजना पात्रता (PMEGP Loan Eligibility)

१. १८ वर्ष पूर्ण असणारे भारताचे नागरिक ज्यांनी याआधी शासकीय अनुदानाचा लाभ घेतला नसेल ते या योजनेसाठी पात्र आहेत.
२. बचत गट सुद्धा PMEGP loan साठी पात्र आहेत.
३. या योजनेअंतर्गत उत्पन्नाची कोणतीही अट नाही, सर्व उत्पन्न गटातील उमेदवार यासाठी पात्र आहेत.
४. आपल्याला जर एखादा १० लाखापेक्षा अधिकचा उत्पादन प्रकल्प किंवा ५ लाखापेक्षा जास्तीचा सेवा प्रकल्प सुरु करायचा असेल तर आपले शिक्षण कमीत कमी आठवी पास असले पाहिजे.
५. १० लाखापेक्षा कमी रकमेचा उत्पादन प्रकल्प व ५ लाखापेक्षा कमी रकमेचा सेवा प्रकल्प सुरु करायचा असेल तर शिक्षणाची कोणतीही अट नाही.
६. हि योजना मुख्यत्वे रोजगार निर्मितीला लक्ष ठेऊन सुरु केली आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत नवीन प्रोजेक्ट पात्र आहेत.
७. सहकारी संस्था कायद्याअंतर्गत नोंदणी असलेल्या संस्था सुद्धा PMEGP Loan साठी पात्र आहेत.

PMEGP प्रोजेक्ट कॉस्ट (PMEGP Project Cost)

प्रकल्पाचा प्रकार
प्रकल्प खर्च (जास्तीत जास्त)
उत्पादन क्षेत्र
रु. ५० लाख
सेवा क्षेत्र
रु. २० लाख

PMEGP कर्ज रक्कम (PMEGP Loan Amount)

संवर्ग
कर्ज
सामान्य प्रवर्ग
९०%
विशेष प्रवर्ग
(SC/ST/OBC/Minorities/Women/PH)
९५%

PMEGP कर्जाचे स्वरूप (PMEGP Loan Type)

PMEGP Loan हे जास्तीत जास्त ५० लाख रुपयापर्यंत मिळू शकते यामध्ये मुदत कर्ज (TERM LOAN) वर खेळते भांडवल (WORKING CAPITAL) या दोन्हीचा समावेश आहे, परंतु एकूण कर्जामध्ये खेळते भांडवल जास्तीत जास्त ४०% पेक्षा जास्त असू नये.

PMEGP मार्जिन मनी / स्व:गुंतवणुक (PMEGP Margin)

संवर्ग
कर्ज
सामान्य प्रवर्ग
१०%
विशेष प्रवर्ग
(SC/ST/OBC/Minorities/Women/PH)
५%

PMEGP व्याज दर (PMEGP loan interest rate)

  • बँक कर्जाचा व्याजदर प्रचलित दराप्रमाणे असतो.
  • PMEGP कर्ज योजनेअंतर्गत ज्या प्रकल्पासाठी कर्ज घेतले आहे त्या प्रमाणे बँक आपल्या या कर्जाला व्याज लावत असतात.
  • उदा. बँका व्याजदर लावताना विविध गटवारी करतात जसे की MSME लोन, शेतीशी निगडित कर्ज, अन्न प्रक्रिया कर्ज अशा विविध प्रकारात वेगवेगळे व्याज दर लागत असतात. सरासरी बँकांचे व्याजदर ९ ते ११ टक्क्यांच्या आसपास आहेत.

PMEGP कर्जाला तारण (Security for PMEGP Loan)

  • कर्जरकमेमधून खरेदी केली सर्व मशिनरी किंवा असेट्स बँकेकडे तारण असतात.
  • १० लाखांपर्यंतच्या कर्जांना कोणतेही तारण देण्याची आवश्यकता नसते कारण १० लाखांपर्यंतची CGTMSE गॅरंटी अंतर्गत कव्हर होतात.
  • त्यासोबतच त्या त्या प्रकल्पाच्या प्रकारानुसार १० लाखाच्या वरील कर्जालासुद्धा CGTMSE गॅरंटी घेता येते किंवा आपण त्यासाठी इतर मालमत्ता तारण देऊ शकता.

PMEGP कर्जासाठी लागणारी कागदपत्रे (PMEGP loan documents)

१. उद्यम आधार ( उद्यम आधार ५ मिनिटात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा )
२. पॅन कार्ड
३. आधार कार्ड
४. पासपोर्ट आकाराचा फोटो
५. वीज बिल
६. भाडे करार
जागेची कागदपत्रे (जागा स्वतःची असल्यास)
७. प्रोजेक्ट रिपोर्ट
८. खरेदी करणार असलेल्या वस्तूंची किंवा मशीनची कोटेशन
९. व्यवसाय परवाना उदा. उद्योग रजिस्ट्रेशन, शॉप ऍक्ट, FSSAI, इतर परवाने
१०. PMEGP पोर्टलवर केलेल्या अर्जाची प्रत
११. स्व:गुंतवणूक उपलब्ध असलेचा पुरावा
१२. प्रकल्पानुसार इतर कागदपत्रे

PMEGP परतफेड कालावधी (PMEGP Repayment Period)

PMEGP loan scheme अंतर्गतकर्ज परतफेडीचा कालावधी 3 ते 7 वर्षापर्यंतचा असतो. परतफेड कालावधी हा वेगवेगळ्या प्रकल्पावर अवलंबून असतो.

PMEGP अनुदान (PMEGP Subsidy)

संवर्ग
ग्रामीण
शहरी
सामान्य प्रवर्ग
२५%
१५%
विशेष प्रवर्ग
(SC/ST/OBC/Minorities/Women/PH)
३५%
२५%
  • वरील अनुदान कर्ज देणारी बँक ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या लॉगिन मधून कर्ज वितरित केल्याच्या १५ दिवसाच्या आत क्लेम करत असते आणि हि रक्कम पुढील १५ दिवसात कर्ज देणाऱ्या बँकेकडे जमा होत असते. कर्ज वितरित झाल्यानंतर आपण याचा कायम पाठपुरावा घेतला पाहिजे कारण या मध्ये यामध्ये काही त्रुटी असल्यास बँक आपल्याला कळवते त्यामुळे ती त्रुटी आपण लवकरात लवकर पूर्ण करावी.
  • हे अनुदान बॅक एंडेड (BACK ENDED) स्वरूपाचे असते म्हणजे हे अनुदान आपल्या कर्जाला परतफेडीच्या शेवटच्या रकमेला जोडले जाते त्यामुळे आपल्याला कर्जामध्ये अनुदानाएवढी रक्कम शिल्लक असे पर्यंत परतफेड करावयाची असते व त्यापुढे अनुदानाची रक्कम वापरून कर्ज बंद केले जाते.
  • अनुदान हे ३ वर्षासाठी लॉक असते व आपल्याला ३ वर्षापर्यंत आपले कर्ज सुरु ठेवणे बंधनकारक असते.
  • जेवढे अनुदान जमा झालेले आहे त्या रकमेला बँक व्याज आकारात नसते, तरीही आपण आपले कर्ज खाते नियमित तपासून पाहावे व आपल्याला किती व्याज लागत आहे याची कायम नोंद ठेवावी.
  • समजा ३ वर्षाच्या आत आपले कर्ज थकीत (NPA) झाले तर बँक आपले अनुदान कर्जाला जामोद घेते व पुढील वसुलीसाठी आपल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करते.

PMEGP योजना राबविणारे विभाग (PMEGP Sponsoring Agency)

हि योजना खादी व ग्रामोद्योग महामंडळामार्फत राबविली जाते तसेच जिल्हा उद्योग कार्यालयामार्फत राबविली जाते, आपण या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता त्यानंतर आपल्याला मुलाखतीसाठी बोलावून योग्य उमेदवार निश्चित केले जातात.

PMEGP उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षण (PMEGP EDP training)

  • उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण pmegp EDP training (Entrepreneurship Development Programme)
  • १० लाखांपर्यंतच्या प्रकल्पासाठी ५ दिवसाचे प्रशिक्षण आणि १० लाखापेक्षा जास्त प्रकल्पासाठी १० दिवसाचे प्रशिक्षण असते. हे प्रशिक्षण प्रत्येक उमेदवारासाठी अनिवार्य असते.

PMEGP Loan योजनेमधील काही महत्वाचे मुद्दे (PMEGP Points to remember)

  • एका कुटुंबातील एकच व्यक्ती योजनेसाठी पात्र आहे.
  • कुटुंब म्हणजे स्वतः व पत्नी परंतु भाऊ वेगळे राहत असतील तर ते वेगवेगळे अर्ज करू शकतात.
  • हे अनुदान फक्त एकदाच मिळत असते.
  • प्रकल्पाच्या दर्शस्थानी योजनेच्या माहितीचा व बँकेचा बोर्ड लावणे बंधनकारक आहे.
  • बँक आणि KVIC स्वतः किंवा इतर संस्थांमार्फत आपल्या प्रकल्पाचे केव्हाही पडताळणी करू शकते.
  • या कर्जाचे टेकओव्हर करता येणार नाही.

PMEGP उद्योग लिस्ट प्रकार (PMEGP Business List Type)

  • कृषी आधारित अन्न प्रक्रिया
  • वन-आधारित उत्पादने
  • हाताने तयार केलेला कागद आणि फायबर
  • खनिज-आधारित उत्पादने​​​​​​​
  • पॉलिमर आणि केमिकल-आधारित उत्पादने​​​​​​​
  • ग्रामीण अभियांत्रिकी आणि बायो-टेक
  • सेवा आणि वस्त्र

PMEGP निषिद्ध प्रकल्पांची यादी (PMEGP Negative List)

PMEGP योजनेअंतर्गत खालील प्रकल्प करता येणार नाहीत:

  • मांस प्रक्रिया
  • बिडी, पान, सिगारेट संबंधित उद्योग
  • शेतीमधील पीक उत्पादन
  • कॅरीबॅग उत्पादन
  • पश्मिना लोकरीचा उद्योग
  • पर्यावरणाला हानी पोचवणारे इतर उद्योग
  • सामाजिक दृष्ट्या निषिद्ध उद्योग
  • कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करणारे उद्योग

PMEGP योजना संपर्क ( PMEGP Scheme Contact)

PMEGP Frequently Asked Questions

१८ वय वर्ष पूर्ण असणारे सर्व व्यक्ती यासाठी पात्र आहेत.उत्पादन क्षेत्रातील रु. 10 लाख आणि रु. पेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांसाठी किमान आठवी इयत्ता पास. व्यवसाय / सेवा क्षेत्रात 5 लाख. PMEGP अंतर्गत मंजुरीसाठी फक्त नवीन प्रकल्पांचा विचार केला जातो.

PMEGP योजनेनंतर्गत वर दिलेल्या निषिद्ध यादीतील व्यवसाय वगळता सर्व व्यवसाय पात्र आहेत.

Prime Minister Employment Generation Programme म्हणजेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

उत्पादन प्रकल्पासाठी जास्तीस्त जास्त मर्यादा ५० लाख तर सेवा क्षेत्रासाठी २० लाख आहे.

नाही, पगारदार व्यक्ती किंवा इतर कोणतेही उत्पन्न असणारी व्यक्ती या योजनेस पात्र नाही, फक्त नवउद्योजकांसाठी हि योजना आहे.

इतर सरकारी योजना

  • All Posts
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना माहिती
  • इतर सरकारी योजना
Mass Image Compressor Compressed this image. https://sourceforge.net/projects/icompress/ with Quality:80

October 20, 2024/

PMFME Scheme | १० लाखापर्यंत अनुदान । प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजना PMFME प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया…

Scroll to Top
× आमच्याकडून योजनेच्या संपूर्ण मदतीसाठी येथे क्लिक करा