CMEGP कर्ज अनुदान योजना | ५० लाखापर्यंत कर्ज १७.५० लाखापर्यंत अनुदान

CMEGP Scheme

CMEGP कर्ज अनुदान योजना म्हणजे काय ? (What is CMEGP scheme?)

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच Chief Minister Employment Generation Programme (CMEGP) ही योजना सुरु करण्याचा
उद्देश्य महाराष्ट्र राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे हा आहे.
CMEGP Scheme ची अंमलबजावणी शासनाच्या जिल्हा पातळीवरील दोन संस्थांमार्फत केली जाते त्यातील एक आहे “जिल्हा उद्योग केंद्र”(District Industries Center)
व दुसरी आहे “महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोदयॊग महामंडळ” Maharashtra State Khadi and Village Industries Boards (KVIB).

महत्त्वाचे मुद्दे | Table of Contents

CMEGP योजनेची वैशिष्ट्ये ( Key Features of the CMEGP Scheme)

१. ५० लाखापर्यंत कर्ज
२. ३५% पर्यंत अनुदान मिळते
३. कमीत कमी कागदपत्रे
४. बँकाकडून प्राधान्याने कर्जवाटप
५. कमीत कमी मार्जिन मनी
६. उद्योजकता प्रशिक्षण
७. रोजगार निर्मिती
८. ग्रामीण भागाला प्राधान्य

CMEGP योजने अंतर्गत अनुदान ( CMEGP scheme subsidy details)

या योजनेमध्ये प्रामुख्याने चार प्रकारात अनुदान दिले जाते ज्यापैकी दोन प्रकार म्हणजे ग्रामीण व शहरी आणि इतर दोन म्हणजे सामाजिक आरक्षणावर आधारित जेणेकरून समाजामधील दुर्लक्षित घटकांना या योजनेचा लाभ घेता यावा.

प्रकल्प खर्चावर आधारित अनुदान

प्रकल्पाचे स्थान
ग्रामीण
शहरी
सामान्य प्रवर्ग
२५%
१५%
विशेष प्रवर्ग
(SC/ST/OBC/Minorities/Women/PH)
३५%
२५%

CMEGP Scheme मध्ये मिळणारी अनुदान रक्कम (CMEGP Subsidy)

अनुदान रक्कम (Subsidy limit)

प्रकल्पाचे स्थान
ग्रामीण ( उत्पादन )
ग्रामीण ( सेवा )
शहरी ( उत्पादन )
शहरी ( सेवा )
सामान्य प्रवर्ग
१२.५० लाख
२.५ लाख
७.५० लाख
१.५० लाख
विशेष प्रवर्ग
(SC/ST/OBC/Minorities/Women/PH)
१७.५० लाख
३.५० लाख
१२.५० लाख
२.५० लाख

CMEGP योजनेसाठी पात्रता निकष (CMEGP Scheme Eligibility)

१. महाराष्ट्रातील रहिवाशी असावा .ज्याचे वय १८ ते ४५ वर्ष आहे. विशेष प्रवर्गासाठी पाच वर्ष वयोमर्यादा शिथील आहे म्हणजेच त्यांच्यासाठी वय वर्ष ५० पर्यंत या योजनेअंतर्गत पात्र आहेत.
२. CMEGP Scheme हि रोजगार निर्मिती योजना आहे त्यामुळे यासाठी कुठलीही उत्पन्नाची अट नाही.
३. वैयक्तिक लाभार्थी, प्रोपरायटरशिप, पार्टनरशिप किंवा बचत गट या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
४. रु. १० लाखांपर्यंतच्या प्रकल्पासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही परंतु रु १० लाख ते रु २५ लाख पर्यंतच्या प्रकल्पासाठी लाभार्थी किमान सातवी पास असावा आणि रु. २५ लाख रुपयांपेक्षा अधिकच्या प्रकल्पासाठी लाभार्थी किमान दहावी पास असावा.
५. कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.
६. तसेच इतर कुठल्याही योजनेअंतर्गत जर आपण अगोदर अनुदानाचा लाभ घेतला असेल तरीही आपण या योजनेसह पात्र नाहीत.

CMEGP Scheme

प्रकल्प खर्चाची मर्यादा (Eligible Project Cost for CMEGP Scheme)

बहुतेक व्यवसाय दोन भागामध्ये विभागलेले आहेत त्यापैकी एक उत्पादन आधारीत उद्योग व सेवा आधारित उद्योग, या दोन्ही घटकासाठी प्रकल्प खर्चाची मर्यादा वेगवेगळी आहे.

प्रकल्पाचा प्रकार
प्रकल्प खर्च मर्यादा
उत्पादन क्षेत्र
रु. ५० लाख
सेवा क्षेत्र
रु. १० लाख

CMEGP अंतर्गत कर्ज मर्यादा ( CMEGP loan limit)

क्षेत्रनिहाय कर्ज मर्यादा
कर्ज मर्यादा
उत्पादन क्षेत्र ( सामान्य प्रवर्ग )
रु. ४५ लाख
सेवा क्षेत्र (सामान्य प्रवर्ग)
रु. ९ लाख
उत्पादन क्षेत्र (विशेष प्रवर्ग)
रू. ४७.५० लाख
सेवा क्षेत्र (विशेष प्रवर्ग)
रू. ९.५० लाख

प्रवर्ग निहाय कर्ज मर्यादा

प्रवर्ग निहाय कर्ज मर्यादा
कर्ज मर्यादा
सामान्य प्रवर्ग
९०%
विशेष प्रवर्ग
(SC/ST/OBC/Minorities/Women/PH)
९५%

CMEGP Scheme अंतर्गत पात्र उद्योग व प्रकल्प (cmegp maharashtra business list)

या योजनेअंतर्गत बहुतेक सर्व उत्पादन प्रकल्प (cmegp maharashtra udyog list), सेवा क्षेत्रातील प्रकल्प (cmegp udyog list) पात्र आहेत.
पुढे दोन्ही क्षेत्रातील व्यवसायाची यादी दिलेली आहे जेणेकरून आपल्या लक्षात येईल कि कुठले उद्योग पात्र आहेत.

उत्पादन क्षेत्र (प्रकल्प खर्च मर्यादा रु. ५० लाख) Manufacturing Project List

१. रेडिमेड गारमेंट
२. मिल्क प्रॉडक्ट्स (तुप, खवा, आइसक्रीम, पनीर इ)
३. मिनरल वॉटर प्लांट
४. गांढूळ खत निर्मिती
५. टिन पत्रा तयार करणे
६. अलुमिनियमची भांडी तयार करणे
७. कुलर बनवणे
८. गुळ उत्पादन
९. बेकरी उत्पादन (बेकरी प्रॉडक्ट तयार करणे फक्त विकणे नाही)
१०. फर्निचर तयार करणे
११. फॅब्रिकेशन
१२. तेल घाना व पॅकेजिंग
१३. गादी / कुशन तयार करणे
१४. डिजिटल प्रिंटिंग
१५. पेपर प्रॉडक्ट्स (बॅग्स, प्लेट्स, ग्लास)
१६. दाल मिल
१७. हळद प्रक्रिया
१८. भाज्या निर्जलीकरण (कांदा पावडर)
१९. पशुखाद्य
२०. अगरबत्ती उत्पादन
२१. पापड, मसाले, लोणचे उत्पादन
२२. शेती अवजार उत्पादन
२३. मध उत्पादन
२४. फूड प्रॉडक्ट्स
२५. सोया मिल्क
२६. सिमेंट प्रॉडक्ट्स
२७. फळे व भाजीपाला प्रोसेससिंग
२८. निंबोळी अर्क तयार करणे

सेवा क्षेत्रातील प्रकल्प (रु १० लाखापर्यंत) Service Sector Project List

१. ई सेवा केंद्र
२. झेरॉक्स सेंटर
३. टायपिंग डि टी पी जॉब वर्क
४. टी स्टॉल
५. मेस
६. टेलरिंग
७. पिठाची चक्की
८. मिरची कांडप
९. फोटोग्राफी
१०. सर्व्हिसिंग सेंटर
११. मोबाइल रिपेअर
१२. इंजिनीरिंग वर्क्स
१३. मालवाहतूक व्यवसाय
१४. डिजिटल प्रिंटिंग
१५. इलेकट्रीशन
१६. प्लम्बिंग
१७. व्हील अलाइनमेंट
१८. मंडप डेकोरेशन
१९. सलून
२०. ब्युटीपार्लर
२१. मळणी यंत्र

CMEGP Scheme | योजनेची अंमलबजावणी करणारे शासकीय विभाग

महाराष्ट्रात CMEGP Yojana दोन विभागामार्फत राबवली जाते:

१. जिल्हा उद्योग केंद्र
२. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ

कर्ज देणाऱ्या बँका (CMEGP bank list)

१. सर्व सरकारी बँका
२. सर्व ग्रामीण बँका
३. सर्व प्रायव्हेट बँक

CMEGP Scheme अंतर्गत मिळणाऱ्या बँक कर्जासंबंधी CMEGP loan details)

१. कर्ज रक्कम : या योजनेमध्ये बँक सामान्य प्रवर्गातील अर्जदाराची ९०% पर्यंत कर्ज देते तर राखीव प्रवर्गातील अर्जदाराची ९५% पर्यंत कर्ज पुरवठा करते.
२. कर्ज प्रकार : या योजनेअंतर्गत मुदत कर्ज व कॅश क्रेडिट या दोन्ही प्रकारात कर्ज पुरवठा केला जातो. अनुदान रक्कम प्रकल्पाच्या एकूण रकमेवर दिले जाते. परंतु कॅश क्रेडिट चा वापर पूर्णपणे झाला असेल तरच हि रक्कम अनुदानाला पात्र ठरवता येईल.
३. व्याज दर : व्याज दर हे बँकेच्या नियमानुसार आकारले जातील.
४. परतफेड कालावधी : परतफेड कालावधी सामान्यतः ३ ते ७ वर्षापर्यंत दिला जातो.
५. लॉक इन कालावधी : आपले कर्ज कमीत कमी अनुदानाच्या लॉक इन कालावधी पर्यंत तरी सुरु ठेवने बंधनकारक असते.

लोकसंख्येचा निकष

२०११ च्या जनगणनेनुसार २०००० लोकसंख्या पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागाला ग्रामीण समजले जाते व २०,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भागाला शहरी समजले जाते व त्यानुसार अनुदानाची टक्केवारी ठरवली जाते. यासाठी आपल्याला आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाकडून लोकसंख्येचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते.

CMEGP कागदपत्रे यादी (CMEGP documents list)

१. उद्योग आधार ( उद्योग आधार ५ मिनिटात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा )
२. पासपोर्ट साईझ फोटो
३. आधार कार्ड
४.. रहिवाशी प्रमाणपत्र
५. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
६. हमी पत्र (Undertaking Form for CMEGP Scheme)
७. प्रोजेक्ट रिपोर्ट
८. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
९. ट्रैनिंग प्रमाणपत्र (EDP Training Certificate)
१०. स्पेशल प्रवर्ग प्रमाणपत्र (दिव्यांग प्रमाणपत्र)

उद्योजगता विकास कार्यक्रम (Entrepreneurship Development Programme)

CMEGP Scheme अंतर्गत पात्र सर्व अर्जदारांना उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत ट्रैनिंग घेणे बंधनकारक असते. या ट्रैनिंग मध्ये व्यवसायासंबंधी काही महत्वाच्या गोष्टी शिकवल्या जातात
जसे कि आर्थिक नियोजन, व्यवस्थापकीय कौशल्य, मार्केटिंग, अकाउंटिंग इ. EDP ट्रैनिंग चा कालावधी सेवा क्षेत्रातील प्रकल्पासाठी एक आठवड्याचा आहे व उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पासाठी दोन आठवड्याचा आहे.

व्यवसाय नोंदणी (Business Registration)

या CMEGP Scheme अंतर्गत कर्ज प्रकरण करण्यासाठी आपला व्यवसाय उद्योग आधार नंबर काढून घेणे बंधनकारक आहे,

CMEGP Scheme साठी पात्र नसलेले व्यवसाय (List of Negative Activities under CMEGP)

१. कत्तलखाना
२. मास प्रक्रिया
३. बिडी, पान, सिगारेट उद्योग
४. मद्य विक्री व मद्य विक्री करणारे हॉटेल
५. शेती मशागत
६. फळ शेती, फुलशेती, रेशीम शेती
७. शेळीपालन, कुक्कुटपालन
८. प्रदूषण महामंडळाने किंवा शासनाने बॅन केलेल्या वस्तू

बँकेत कर्जमागणीसाठी जाताना कसा दृष्टीकोन ठेवावा?

१. बॅंकेत गेल्या गेल्या बॅंक अधिकार्यांना सांगू नये कि आपल्याला cmegp अंतर्गत कर्ज करायचे आहे कारण बॅंकेला आपण कोणत्या योजनेत कर्ज करत आहात यांच्याशी काही देणे घेणे नसते,
बॅंक ज्या व्यवसायासाठी कर्ज देणार आहे किंवा ज्याला कर्ज देणार आहे यांच्याविषयी जानून घेण्यात रस असतो.
त्यामुळे आपण असे कधीही समजू नये कि बॅंकेला या योजनेत आपल्याला कर्ज देणे बंधनकारक आहे.
२. एक गोष्ट लक्षात ठेवा बॅंका चांगल्या कर्जदारांना कर्ज देणारच असतात तरीही कर्ज मिळणं हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्यासारखे बॅंकेत कर्ज मागू नये,
आपल्या वागण्यात नेहमी नम्रपणा असावा. तुमच्यासाठी हे कर्ज प्राथमिकता असू शकते पण बॅंक अधिकार्यांसाठी यांच्याही पेक्षा इतर कितीतरी महत्वाची कामे असु शकतात.
३. बँकेत जाण्याआधी आपल्या व्यवसायाविषयी व आपल्या प्रकल्पाविषयी पुर्ण माहिती घेऊन जावे. आपल्या व्यवसायाविषयी अंदाजित प्रश्नांची उत्तरे तयार ठेवावीत.
४. आपल्या व्यवसायाविषयी प्रकल्पाविषयी सर्व माहिती सांगून झाल्यानंतर व बॅंकेच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यानंतर आपण या योजनेअंतर्गत अनुदानासाठी अर्ज करणार आहोत हे सांगावे जेणेकरून बॅंकेला वाटणार नाही कि तुम्ही फक्त अनुदानासाठी कर्ज करत आहात.

PMEGP योजना संपर्क ( PMEGP Scheme Contact)

CMEGP नेहमी विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)

ह्या योजने अंतर्गत छोट्या व मध्यम उद्योगांना अनुदान दिले जाते जेणेकरून या उदृयोगांमार्फत रोजगार निर्मिती होईल.

प्रकल्प खर्चाची मर्यादा उत्पादन क्षेत्रासाठी ५० लाख व सेवा क्षेत्रासाठी १० लाख आहे या पैकी ९०-९५% पर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते.

Cmegp सबसिडी अशा प्रकारे कर्ज खात्याला लिंक केली जाते जेणेकरून सबसिडी एवढ्या रकमेला व्याज लागणार नाही.

१८ ते ४५ वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे

सबसिडी रक्कम जमा होण्यासाठी एक ते दिड महिण्याचा कालावधी लागू शकतो. (या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींच्या माहितीनुसार)

बॅंकेमध्ये कर्ज मंजुरी होऊन कर्ज वितरणासाठी सरासरी १०-१५ दिवसांचा कालावधी लागू शकतो परंतू बॅंकेकडे असणार्या इतर प्रलंबित कर्ज प्रकरणामुळे वेळ लागू शकतो.

होय, cmegp योजनेअंतर्गत EDP प्रशिक्षण अनिवार्य आहे.

दोन्ही योजना या रोजगार निर्मिती योजना आहेत फक्त फरक एवढाच आहे कि pmegp हि योजना केंद्र पुरस्कृत आहे व cmegp हि योजना महाराष्ट्र शासन पुरस्कृत आहे.

या योजनेअंतर्गत प्रकल्पखर्चाची मर्यादा उत्पादन क्षेत्रासाठी ५० लाख व सेवा क्षेत्रासाठी १० लाख इतकी आहे.

इतर सरकारी योजना

  • All Posts
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना माहिती
  • इतर सरकारी योजना
Mass Image Compressor Compressed this image. https://sourceforge.net/projects/icompress/ with Quality:80

October 20, 2024/

PMFME Scheme | १० लाखापर्यंत अनुदान । प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजना PMFME प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया…

Scroll to Top
× आमच्याकडून योजनेच्या संपूर्ण मदतीसाठी येथे क्लिक करा