अण्णासाहेब पाटील गाय गोठा कर्ज योजना | Annasaheb Patil Gaay Gotha Karj Yojana

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत शेतकरी वर्गाला विशेष महत्व दिले गेले आहे,कारण शेतीवर व शेतीशी संबधित व्यवसायावर अनेक शेतकरी अवलंबून आहेत.
शेती पूरक व्यवसायामध्ये गाय गोठा या व्यवसायाकडे अनेक शेतकरी वळले आहेत. गाय गोठा कर्ज योजना ही सरकारची एक शेतकर्यांसाठी प्रोत्साहन योजना आहे. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना गोठा आणि गाय घेण्यसाठी व त्यांना सांभाळण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना गोठा बांधणीसाठी लागणाऱ्या कर्जाला शासनाकडून एक प्रकारे मदतच होते. त्यामुळे छान गोठा बांधून गायींचे पालन करणे त्यांच्यासाठी सोयीचे होते.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी व तसेच शेती संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकतात. गोठा बांधणीसाठी कर्जाची मदत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा पैशांचा भार कमी होतो. चांगला आणि स्वच्छ गोठा उपलब्ध झाल्याने गायींचे आरोग्य सुधारते. यामुळे दूध उत्पन्न वाढ होते. शेण तसेच गोमूत्र यांसारखे सेंद्रिय खत शेतीसाठी चांगल्या प्रमाणात उपलब्ध होते. ग्रामीण भागात रोजगार वाढीस हातभार लागतो.