Annasaheb Patil Loan Scheme Information: अण्णासाहेब पाटील लोन स्किम बद्दल माहिती
पात्रता अटी:
- द्वितीय लाभ: अर्जदाराला मंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- उत्पन्न मर्यादा: लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उप्तन्न ८ लाख पेक्षा कमी असावे (शासनाच्या निर्गमित केलेल्या नॉन क्रिमीलेयर मर्यादेनुसार).
- संयुक्त कर्जदार: कुटुंबातील सदस्य संयुक्त कर्जदार असू शकतात, परंतु मुख्य अर्जदार रक्त नाते असलेला व्यक्ती आणि पहिला कर्जदार असणे आवश्यक आहे.
- बँक आणि स्थान: कर्ज महाराष्ट्र मध्ये कार्यरत आणि CBS प्रणालीयुक्त बँक कडून घेणे अनिवार्य आहे.
- आरक्षित कोटा: एकूण निधीपैकी ४% दिव्यांगांसाठी आरक्षित आहे. लाभार्थी मानसिक दृष्टया सक्षम असावा.
- कर्ज कालावधी: योजनेचा लाभ कर्ज घेतल्यापासून पुढील ५ वर्ष किंवा प्रत्यक्ष कर्ज कालावधी, जो कमी असेल तोपर्यंत असले.
- कर्ज मर्यादा आणि व्याज: जास्तीत जास्त कर्ज रक्कम १० लाख रुपये आणि व्याजाचा दर १२% वार्षिक आहे. मंडळ जास्तीत जास्त ३ लाख रुपयापर्यंत व्याज रकमेचा परतावा करेल.
- पात्रता तपासणी: आपण पात्र आहेत का नाही हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
महत्त्वपूर्ण माहिती:
- व्यवसाय फोटो: लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू केल्याच्या सहा महिन्यांच्या आत व्यवसायाचे २ फोटो अपलोड करावयाचे आहेत.
- व्याज अनुदान: लाभार्थ्यांना पहिला हफ्ता (मुद्दल + व्याज) अनुदान स्वरूपात मिळणार आहे. तसेच त्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त ३ लाखापर्यंत (१२ टक्क्यांच्या मर्यादेत) कर्ज व्याज परतावा करेल.
- CGTMSE प्रीमियम: राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज प्राप्त झाले आहे अशा लाभार्थ्यांना CGTMSE योजनेअंतर्गत आकारण्यात आलेले प्रीमियम शूल्क व्याज परताव्याच्या रकमेसोबत, लाभार्थ्याने दावा केल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमाहोईल.
- व्याज परतावा: कर्ज देणाऱ्या बँकेच्या नियमानुसार व्याजाची रक्कम बँकेत भरणा केल्यानंतर, एक-रकमी स्वरुपात महामंडळ हे लाभार्थ्याच्या आधारलिंक कर्ज खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा करेल. हा परतावा प्रत्येक महिन्याला वेळेवर हफ्ता परतफेड केल्यास देणेत येईल.
- अधिक योजना: अर्जदाराला या अर्जीत प्रकल्पासाठी इतर कोणत्याही योजनेअंतर्गत, व्याज परतावा/माफी/Interest Subvention योजनेचा लाभ घेतलेला आढळल्यास, एकूण आवश्यक व्याज परतावा वजा इतर योजेनतून घेतलेला व्याजाचा लाभ एवढाच अनुज्ञेय असेल. (उदा. व्याज परतावा आवश्यकता १२% वजा इतर योजनेतून घेतलेला लाभ ५% आहे = ७% एवढा या योजनेतून मिळणारा लाभ असेल.)
- व्यवसाय फोटो अपडेट: लाभार्थ्याने व्यवसाय सुरु केलेनंतर सहा महिन्यामध्ये त्याच्या व्यवसायाचे दोन फोटो अपलोड करावयाचे आहेत. तसेच त्यानंतर प्रत्येक चार महिन्यानंतर लाभार्थ्याने त्याच्या व्यवसायाचे अद्ययावत फोटो अपलोड करावयाचे आहेत.
- फलकावर उल्लेख: लाभार्थ्याला महामंडळाच्या योजनेचा लाभ प्राप्त झाल्यानंतर, लाभार्थ्याच्या व्यवसायाच्या फलकावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक सहाय्यातून सदरचा व्यवसाय सुरु केल्याबाबतचा स्पष्ट उल्लेख करावा. (उदा. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सौजन्याने)
नोंदणी प्रक्रिया:
- ऑनलाइन नोंदणी: अर्जदाराला मंडळाच्या www.udyog.mahaswayam.go.in या संकेतस्थाळावर आधार कार्ड सोबत नोंदणी करणे अनिवार्य आहे.
- ओटीपी सत्यापन: या संकेत स्थळावर नोंदणी करण्यासाठी उमेदवाराचा आधार सोबत लिंक असलेला नंबर सुरु असावा, नोंदणी करण्यासाठी ओटीपी आधार सोबत लिंक असेलेल्या फोन वर प्राप्त होईल. जर फोन नंबर लिंक नसेल किंवा बंद असेल तर उमेदवाराने जवळच्या आधार केंद्रास भेट देऊन फोन नंबर लिंक करून घ्यावा (जवळचे आधार केंद्र शोधण्यासाठी इथे क्लीक करा )
- अर्ज भरणे: अर्ज भरून झाल्यावर उमेदवार कर्ज व्याज परतावा साठी पात्र आहे किंवा नाही किंवा अर्जातील त्रुटींबाबत उमेदवाराला कळवण्यात येईल. उमेदवार प्राप्त असल्यास संबधित पात्रता प्रमाणपत्र (LOI) ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होईल , तसेच कर्ज हमीचे शासनाचे पात्र प्राप्त होईल.
- शपथपत्र: अर्जदाराला अटी व शर्ती मान्य असल्याचे शपथपत्र ऑनलाईन भरावे लागेल.
- कागदपत्रे: अर्ज करतेवेळी महत्वाचे ४ कागतपत्र जमा करणे आवश्यक आहे:
- आधार कार्ड (अर्जदाराचा फोटो आणि आधार आधार क्रमांक असेलेली बाजू)
- राहवासी पुरावा (खालील पैकी कोणतेही एक)
- अद्यावत लाईट बील
- अद्यावत गॅस कनेक्शन पुस्तक
- अद्यावत टेलीफोन बील/ तहसिलदारांनी दिलेला रहिवासी दाखला / रेशन कार्डची प्रत / अर्जदाराचा अद्यावत पासपोर्ट ची प्रत / भाडे कराराची प्रत
- उत्पनाचा पुरावा
- तहसिलदारांनी दिलेले अद्यावत कौटूंबिक उत्पन्नाचा दाखला
- अद्यावत ITR ची प्रत अर्जदारासाठी आणि त्यांच्या/ तिच्या पती/ पत्नीसाठी (असल्यास) पती/ पत्नीची ITR ची प्रत जोडणे आवश्यक असेल
- जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला
- व्यवसाय नोंदणी पूरावा (शॉप ऍक्ट रेजिस्ट्रेशन / Gumasta license आणि उद्यम आधार)
व्याज परतावा मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती
कर्जासाठी आवेदन करताना खालील कागदपत्रे बँकेत जमा करावी:
- व्यक्तिगत ओळख: आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो
- व्यवसाय पुरावा: दुकान नोंदणी प्रमाणपत्र, गुमास्ता लायसन्स, उद्यम आधार
- जागेचा पुरावा: स्वतःची जागा असेल तर संबंधित कागदपत्रे, भाडेतत्वावर असेल तर भाडे करार
- आयकर रिटर्न: जर व्यवसाय सुरू झाला असेल तर गेल्या वर्षांचे आयकर रिटर्न
- उत्पन्नाचा दाखला: नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर तहसीलदार तर्फे मिळालेला उत्पन्नाचा दाखला
- सिबिल स्कोर: सिबिल स्कोरचा अहवाल
- व्यवसाय प्रकल्प अहवाल: यात व्यवसायाची सविस्तर माहिती असावी.
कर्ज मंजूर झाल्यानंतर, व्याज परताव्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतील:
- बँक कर्ज मंजुरी पत्र
- बँक खाते स्टेटमेंट
- व्यवसाय नोंदणी पुरावा
- व्यवसाय प्रकल्प अहवाल
- व्यवसायाचे फोटो
महत्त्वपूर्ण माहिती:
- व्याज अनुदान: पहिला हफ्ता आणि जास्तीत जास्त ३ लाख रुपये व्याज परतावा.
- CGTMSE प्रीमियम: CGTMSE योजनेअंतर्गत कर्ज घेतलेल्यांना प्रीमियम परतावा.
- व्याज परतावा: दर महिन्याला वेळेवर हफ्ता भरल्यास.
- अधिक योजना: इतर योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यानुसार समायोजन.
- व्यवसाय फोटो अपडेट: दर चार महिन्यांनी.
- फलकावर उल्लेख: महामंडळाच्या सहाय्याने व्यवसाय सुरू केल्याचे फलकावर लिहावे.