योजनेच्या संपूर्ण मदतीसाठी क्लिक करा..!

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना | Annasaheb Patil Tractor Scheme

Annasaheb Patil tractor scheme

अण्णासाहेब पाटील महामंडळ शेतीशी संबधित व्यवसाय व उद्योगाला प्रथम मदत करते. महारष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. लोकसंखेच्या जवळ जवळ निम्मे लोक शेती करतात किंवा शेतीवर अवलंबून आहेत. राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेती व शेतीशी निगडीत व्यवसायांचा वाटा हा बारा टक्के पर्यंत आहे.

या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन व शेतकऱ्यांचा विचार करून अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे ट्रॅक्टर योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. अशा अनेक योजना शासन राबवते की जेणेकरून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल व शेतकरी स्वावलंबी बनेल. शेती हा आपल्या देशाचा कणा असल्यामुळे शेतकऱ्यांना सरकारतर्फे योजनेच्या माध्यमातून हातभार लावणे गरजेचे आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ देखील शेतकऱ्यांसाठी योजना राबवते. मराठा समाजाला आर्थिक हातभार लागावा व शेतकऱ्यांची ट्रॅक्टर खरेदीची मागणी लक्षात घेता.महामंडळातर्फे ट्रॅक्टर खरेदीसाठी 15 लाखापर्यंतच्या कर्जावर येणारे व्याज परत देण्यात येणार आहे. त्यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ट्रॅक्टर व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत ट्रॅक्टर साठी स्थगित झालेली प्रकरणे देखील सुरू करण्याची कार्यवाही चालू झालेली आहे.

महामंडळाच्या योजनांची जनजागृती राज्यामध्ये गाव पातळीपर्यंत करण्याच्या उद्देशाने जिल्हा निहाय दौरे व मेळाव्यांचे आयोजित करण्यात आली असून राज्यातील विविध तालुक्यांमध्ये व जिल्ह्यांमध्ये महामंडळाच्या योजनांची प्रसिद्धी करण्यात येत आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज प्रकरणे सुरू करून त्याचा लाभ गरीब शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्या करता विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. लाभार्थ्याच्या फायद्यासाठी महामंडळातर्फे योजनांमध्ये करण्यात आलेले बदल खालील प्रमाणे :

१. व्यक्तिगत वैयक्तिक कर्ज ५० लाखापर्यंत घेऊ शकता व शासनाने ट्रक्टर खरेदीसाठी व्याज परतावा योजना अंतर्गत रक्कम १५ लाख रु पर्यंत वाढवण्यात आली आहे.

२. शेतकर्यांना या अगोदर व्याज परतावा हा ३ लाख रु पर्यंत भेटत होता परंतु सरकारने आता हि रक्कम वाढवली आहे व ती ४.५ लाख रुपयापर्यंत केली आहे.

३. शेतकर्यांना या अगोदर कर्ज घेण्याचा कालावधी ५ वर्षापर्यंतच होता परंतु आता तो वाढवून ७ वर्षापर्यंत केला आहे.

अशा पद्धतीने सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठीची ही अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना शेवटपर्यंत पोहोचावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

Scroll to Top
× आमच्याकडून योजनेच्या संपूर्ण मदतीसाठी येथे क्लिक करा