अण्णासाहेब पाटील कर्ज योजना | Annasaheb Patil Loan Scheme

What is Annasaheb Patil Loan Scheme ? / काय आहे अण्णासाहेब पाटील योजना ?

     सरकार मार्फत आपल्या राज्यात जे नवीन युवक युवती स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा नवीन व्यवसायिक उद्योजकांना मदत करण्याच्या हेतूने बिनव्याजी कर्जाची ही योजना चालू करण्यात आली आहे.
     राज्यातील युवकांना व्यवसायामध्ये भरारी घेता यावी उद्योग क्षेत्रात राज्य पुढे जावे यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील नवीन उद्योजकांना एकदम सोप्या पद्धतीने व त्वरित कर्ज मंजूर करून कर्जावरील व्याज परतावा दिला जातो
सदर कर्ज मंजूर करण्यासाठी महामंडळ मदत  करते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ (मराठा समाजासाठी)

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (इतर समाजासाठी)

OBC loan scheme | ओबीसी कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना

Annasaheb Patil tractor scheme

योजना कागदपत्रे | Scheme Documents

३. रहिवाशी असल्याचा दाखला – बँक पासबुक / भाडेकरार / घरातील लाईट बिल / गॅस पुस्तक / टेलिफोन बिल / रेशन कार्ड / पासपोर्ट

४. इतर कागदपत्रे 

अण्णासाहेब पाटील व इतर योजनांच्या अडकलेल्या व नामंजूर प्रकरणांबाबत उपाययोजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत झालेले प्रमुख बदल | Changes in annasaheb patil loan scheme

१. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत झालेला प्रमुख बदल म्हणजे कर्जाचा कालावधी ५ वर्षाहून ७ वर्षापर्यंत वाढवलेला आहे.
२. अर्जदाराची वयोमर्यादा ही १८ पासून ते ६० पर्यंत करण्यात आलेली आहे.
३. अर्जदाराचे उत्पन्न हे ८ लाखापेक्षा कमी हवे.
४. नवीन नियामाप्रमाणे सगळे कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.

योजना व्यवसाय यादी | Loan Scheme Businesses list

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय प्रकारात कर्ज उपलब्ध आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यवसाय प्रकारांची यादी खालीलप्रमाणे आहे:

१. शेती व शेती शी निगडीत व्यवसाय | Agriculture and alligned businesses
२. मॅन्युफॅक्चरिंग संबधित व्यवसाय | Manufacturing Buisnesses
3. सेवा उद्योग | Service industry
४. सर्व व्यावसायिक वाहने | All commercial vehicle

योजना सविस्तर माहिती अटी व शर्ती | Scheme Details

१. या योजनेचा फायदा त्याच व्यक्तींना घेता येतो ज्यांनी या अगोदर अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कोणत्याही प्रकारचा लाभ घेतलेला नाही.
२. अर्जदाराचे उत्पन्न हे जास्तीत जास्त ८ लाख असावे म्हणजेच ८ लाख पेक्षा जास्त नसावे.
३. योजना मंजूर झाल्यानंतर व्यवसायाचा फोटो पाठवणे आवश्यक आहे.
४. अर्जदाराचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर योजनेसाठी अर्ज करता येईल.
५. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर प्रत्येक महिन्याचा व्याजाचा परतावाची रक्कम कर्ज प्रकारानुसार तिमाही किंवा सहामाही पद्धतीने आधार लिंक असलेल्या खात्यात जमा होईल मिळेल.
६. या योजनेअंतर्गत कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा लाभ घेऊ शकते.
७. जर महामंडळाला तुम्ही या अगोदर लाभ घेतल्याचे आढळले तर रक्कम परत करावी लागेल.
८. लाभ घेणाऱ्याला सर्व अटी मान्य झाल्या पाहिजे तसे शपथ पत्र द्यावे लागेल.
९. सदर योजनेच्या माध्यमातून मराठा व इतर जातीय युवकांना ज्यांना महामंडळ उपलब्ध नाही त्यांना लाभ घेता येतो.

अण्णासाहेब पाटील महामंडळाबाबत गैरसमज आणि चुकीच्या नावांचा उल्लेख | Scheme Misunderstandings & Mention Of Wrong Names

१. बऱ्याचदा ज्याला कर्ज घ्यायचे आहे त्याला अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची माहिती मिळते आणि त्याला वाटते कि मह्मंडळ कर्ज देते. परंतु महामंडळामार्फत कुणालाही कर्ज भेटत नाही त्यासाठी महामंडळाकडे फाईल मंजुरीसाठी म्हणजेच LOI साठी अर्ज करावा लागतो.

२. अर्ज करून तुमची फाइल मंजूर झाल्यानंतर तुम्हाला LOI मिळतो व त्या LOI च्या माध्यमातून तुम्हाल बँक कर्ज देते. या योजनेत कोणती बँक तुम्हला कर्ज देऊ शकते त्याची यादी खालील लिंक वर पहा.

३. अनेकजण या योजनेचा उल्लेख अण्णाभाऊ साठे कर्ज योजना म्हणून देखील करतात परंतु अण्णाभाऊ साठे कर्ज योजना वेगळ्या धर्तीवर काम करते.

४. अनेकजण या योजनेचा उल्लेख अण्णाभाऊ पाटील म्हणून देखील करतात. हा शब्द प्रयोग आदर म्हणून केला जातो कि लोकांच्या चर्चेतून तो शब्द पुढे आला आहे त्याचे उत्तर अद्याप मिळाले नाही.

Loan Scheme Type | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना प्रकार

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ शासन निर्णय

१. अण्णासाहेब पाटील वैयक्तीक / व्यक्तिगत कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ मिळण्यासाठी २१ नोव्हेंबर २०१७ रोजी शासन निर्णय झाला.

२. अण्णासाहेब पाटील योजनेत योजनेत प्रामुख्याने काही बदल झाले त्यासाठी ०१ जानेवारी २०१९ रोजी शासन निर्णय झाला.

इतर समाजासाठी मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ शासन निर्णय

१. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजने प्रमाणे इतर समाजासाठी समकक्ष योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ मार्फत राबविण्यात यावी असा शासन निर्णय झाला. ( शासन निर्णय २८ जानेवारी २०१९ पाहण्यसाठी येथे क्लिक करा ) 

२. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्तीय व विकास महामंडळ मर्या. स्थापना करण्याबाबत शासन निर्णय झाला. ( शासन निर्णय २५ सप्टेंबर १९९८ पाहण्यसाठी येथे क्लिक करा ) 

३. शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग विकास महामंडळ स्थापना करण्याबाबत शासन निर्णय झाला. ( शासन निर्णय २६ मार्च २०१० पाहण्यसाठी येथे क्लिक करा ) 

४. जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर विकास महामंडळ स्थापना करण्याबाबत शासन निर्णय झाला. ( शासन निर्णय ०९ ऑगस्ट २०२३ पाहण्यसाठी येथे क्लिक करा )  

५. संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याबाबत शासन निर्णय झाला. ( शासन निर्णय ०९ ऑगस्ट २०२३ पाहण्यसाठी येथे क्लिक करा )

६. संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ स्थापना करण्याबाबत शासन निर्णय झाला. ( शासन निर्णय ०५ जानेवारी २०२४ पाहण्यसाठी येथे क्लिक करा )

Scroll to Top
× आमच्याकडून योजनेच्या संपूर्ण मदतीसाठी येथे क्लिक करा