महाराष्ट्र राज्य इतर मागास महामंडळ कर्ज योजना | Obc Mahamandal Loan Scheme

महाराष्ट्र राज्य इतर मागास महामंडळ कर्ज योजना काय आहे ?

इतर समाजातील सर्व तरुण उद्योजकांना अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या धर्तीवर सर्व लाभ घेता येतो.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या प्रमणे त्यासारखीच, त्याप्रमाणे काम करणारी व त्याप्रमणे लाभ देणारी समकक्ष योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येत आहे.

सदर योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नवीन बेरीज्गर तरुण उद्योजक व्हावेत त्यांचा व्यवसाय वाढवा यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ मार्फत राबविण्यात यावे असा शासन निर्णय दि. २८ जानेवारी २०१९ रोजी झाला आहे.
इतर समाजातील सर्वाना अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या धर्तीवर सर्व लाभ घेता येतो.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ महामंडळाची स्थापना

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित महामंडळाची दिनांक २५ सप्टेंबर १९९८ अन्वये २३ एप्रिल १९९९ रोजी स्थापना करण्यात आली आहे.

इतर समाजातील प्रवर्गातील बेरोजगारांना आधुनिक आणि पारंपारिक अशा दोन्ही व्यवसायांसाठी कमी व्याजदराने वित्त पुरवठा करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असले तरी स्वयंरोजगाराला चालना देताना उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे , त्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी इतर योजना राबविणे हि पण उद्दिष्टे आहेत.

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाची स्थापना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक २५ ऑगस्ट २००९ अन्वये १८/०६/२०१० रोजी महामंडळाची उपकंपनी म्हणून करण्यात आली आहे.

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वीरशैव – लिंगायत समाजाकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून करण्यात आली आहे.

संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या गुरव समाजाकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून करण्यात आली आहे.

संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाची स्थापना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नाभिक समाजाकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागास महामंडळ कर्ज योजना उद्देश्य

१. राज्यातील इतर समाजातील सर्व तरुणांचे कल्याण व विकासासाठी कृषी क्षेत्र, कृषी उत्पादनाचा पुरवठा आणि साठवण, लघु उद्योग, इमारत बांधणी, व्यापार किंवा उद्योग याची योजना तयार करणे तसेच त्यांना चालना देणे, सहाय्य करणे, सल्ला देणे, मदत करणे, वित्त पुरवठा करणे, त्यांचे संरक्षण करणे.

२. राज्यातील इतर मागासवर्गीयांची आर्थिक स्थिती विकास करणे व त्यात सुधारणा करणे, त्यांचे कामकाज, व्यवसाय, व्यापार किंवा उद्योग सुरु करण्यासाठी त्यांना भांडवल पुरविणे.

३. इतर मागासवर्गीयांसाठी कृषी उत्पादने, वस्तू, साहित्य आणि सामुग्री यांची बनावट, निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती किंवा संघटनांबरोबर काम करणे आणि त्यांच्या कडील मागण्या हाती घेणे आणि त्या इतर मागासवर्गीय लोकांना उपकंत्राटाने देऊन किंवा त्याबाबत त्यांच्याकडे कामाच्या मागण्या सुपूर्द करून, त्यांचे कडून कामे यथायोग्यरीतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.

४. राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे, या प्रयोजनासाठी अहवाल आणि निलप्रती (ब्लू प्रिंट्स) तयार करणे, तयार करून घेणे, आणि आकडेवारी व इतर माहिती गोळा करणे.

Scroll to Top
× आमच्याकडून योजनेच्या संपूर्ण मदतीसाठी येथे क्लिक करा