अण्णासाहेब पाटील प्रोजेक्ट रिपोर्ट | Annasaheb Patil Project Report

सुरुवातीला तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे तो निवडा. व्यवसायाच्या कर्जासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्या अगोदर आपण त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. अनेक जण त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट वर तो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याची पूर्ण जबाबदारी टाकतात. CA जरी व्यवस्थित रिपोर्ट बनवत असले तरी ते आपण दिलेल्या माहितीवरच बनवत असतात. आपण जर आपल्या CA ला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी माहिती उपलब्ध करून दिली नाही तर ते मार्केट ची सर्वसाधारण माहिती भरून रिपोर्ट तयार करतात. मग आपण हा प्रोजेक्ट रिपोर्ट जसेच्यातसे बँकेमध्ये देतो. आणि मग बँक अधिकाऱ्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट बाबत माहिती आपल्याला विचारली तर ती आपल्याला सांगता येत नाही.
प्रोजेक्ट रिपोर्ट बाबत आमच्याकडून मदतीसाठी खाली क्लिक करा: