रिफंड व कॅन्सलेशन धोरण

1. प्राप्त पेमेंटचा परतावा (Refund of Payment Received):

पेमेंट केल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल. जर कोणत्याही कारणास्तव आपली नोंदणी होऊ शकली नाही किंवा आम्ही आपल्याला सेवेचा पुरावा देऊ शकत नसलो, तर कंपनीच्या धोरणानुसार आपल्याला परतावा दिला जाईल. सेवा प्रदान करण्यात आमची असमर्थता असल्यासच आम्ही परताव्याच्या जबाबदारीत राहू. तसेच, आपल्याद्वारे हे मान्य करण्यात येते की, परताव्याची प्रक्रिया करताना एकूण रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम वजा करण्यात येईल, ही वजा करण्यात आलेली रक्कम बँकिंग शुल्क व तृतीय पक्ष पेमेंट गेटवे सेवांच्या चार्जेससाठी घेतली जाईल. सेवा नाकारल्याचे निश्चित झाल्यानंतरच परताव्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. परताव्याची रक्कम आपण ज्या पद्धतीने पेमेंट केली असेल त्याच मार्गाने परत केली जाईल.

2. परतावा वेळापत्रक (Refund Time Frame):

आपली परतावा विनंती आवश्यक सर्व माहिती (उदा. परताव्याचे कारण, बँक तपशील इ.) मिळाल्यानंतर १० ते १५ कार्यदिवसांत प्रक्रिया केली जाईल.

3. अर्जाची रद्दीकरण प्रक्रिया (Cancellation of Application):

चुकीची माहिती दिल्यामुळे अर्ज नाकारला गेला तर त्यासाठी रिफंड मिळणार नाही. अर्ज करताना आपण आवश्यक ओटीपी देण्यास देण्यास असमर्थ असाल तर परताव्याची विनंती ग्राह्य धरली जाणार नाही. एकदा अर्ज केल्यावर तो रद्द करता येणार नाही. अर्ज पूर्ण झाल्यानंतर आणि सेवा पुरविल्याचा पुरावा (Proof of Delivery) दिल्यानंतर परतावा दिला जाणार नाही.

4. परताव्यासाठी विनंती (Refund Request):

परताव्यासाठी विनंती आपण [ईमेल आयडी] या ईमेलवर पाठवू शकता. पेमेंट केलेल्या तारखेपासून ८ दिवसांच्या आत परताव्याची विनंती ग्राह्य धरण्यात येईल.

5. अर्जाविषयी स्पष्टीकरण (Clarification About Application):

अर्ज प्रक्रियेबाबत कोणताही प्रश्न असल्यास आपण [ईमेल आयडी] या ईमेलवर आमच्याशी संपर्क साधू शकता. आपल्या व्यवसायाच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती आवश्यक असल्यास, आमचे प्रतिनिधी ईमेल किंवा कॉलद्वारे आपल्याशी संपर्क साधतील.

6. नैसर्गिक आपत्ती / असामान्य परिस्थिती / तांत्रिक अडचणी :

annasahebpatil.in हे जर वरील सेवा व अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्यास खालील कोणत्याही नैसर्गिक किंवा अपरिहार्य कारणामुळे आम्ही जबाबदार धरले जाणार नाही. यामध्ये भूकंप, पूर, आग, वादळ, वीज कोसळणे, दुष्काळ, दरड कोसळणे, चक्रीवादळ, महामारी, प्लेग, कायद्यात बदल, स्फोट, युद्ध, दहशतवादी हल्ला, संप, सर्वर डाऊन, लॉकआउट, कोर्ट किंवा सरकारी आदेश इत्यादी. वरील घटनांमुळे आमच्या सेवेमध्ये व्यत्यय आल्यास, त्याला आम्ही जबाबदार मानले जाणार नाही.