Terms & Conditions (नियम व अटी)
- ही वेबसाईट केवळ कन्सल्टन्सी, मार्गदर्शन व अर्जप्रक्रिया सेवांसाठी आहे.
- आम्ही कोणतीही शासकीय संस्था, महामंडळ किंवा सरकारशी संबंधित अधिकृत एजन्सी नाही.
- आमच्या सेवा ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ’ योजनेंतर्गत येणाऱ्या अर्ज प्रक्रियेविषयी मार्गदर्शन, कागदपत्र सहाय्य, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, इत्यादी गोष्टींसाठी असतात.
- अर्ज प्रक्रिया सेवा ही पूर्णतः पर्यायी असून, आपल्याला ही प्रक्रिया स्वतंत्रपणे देखील करता येते.
- पेमेंट केल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल. आपण करत असलेले पेमेंट हे आम्ही आपल्याला देत असलेल्या सर्विसचे कन्सल्टन्सी चार्जेस आहेत व कायद्याच्या चौकटीत राहूनच ही फी आम्ही घेत आहोत. आम्ही घेतलेले शुल्क ही आमच्या सेवा/कन्सल्टन्सीची फी आहे – ह्या मध्ये कुठलीही शासकीय शुल्क समाविष्ट नाही.
- सरकारी निर्णय, नियम किंवा धोरणांमध्ये बदल झाल्यास आम्ही वेळोवेळी आपल्याला कळवू. त्याप्रमाणे सहकार्य करणे व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे हे आपले कर्तव्य असेल अन्यथा आमची कोणतीही जबाबदारी राहणार नाही.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खरी, अचूक असणे हे ग्राहकाचे कर्तव्य आहे. चुकीची माहिती दिल्यास किंवा कागदपत्रात फेरफार केल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी ग्राहकाची राहील.
- शासनाच्या नियमांच्या अधीन राहून योग्य कागदपत्रे पुरविणे व अचूक माहिती देणे हे आपले कर्तव्य आहे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यामुळे अर्ज नाकारला गेला तर त्याची जबाबदारी ग्राहकाची राहील.
- या वेबसाइटवरील माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रदान केली आहे आणि ती सूचना न देता बदलू शकते.सदर माहिती चालू स्थितीमध्ये संपूर्ण असेल असे काही नाही. तसेच संपूर्णता अचूक असेल असे काही नाही. आम्ही आमच्या वेळेनुसार शासकीय वेबसाईट व शासन निर्णय नुसार झालेल्या बदलानुसार वेळोवेळी बदलण्याचा प्रयत्न करू.आणि वेळेतच बदल झाले पाहिजे हे आम्हाला बंधनकारक असणार नाही. चालू अचूक माहितीसाठी तुम्ही चालू शासन निर्णय तसेच अधिकृत संकेत स्थळावर भेट देऊ शकता.
- अर्ज प्रक्रिया करताना शासनाच्या वेबसाईटमध्ये असलेल्या अडचणी (सर्व्हर डाऊन, तांत्रिक अडथळे) किंवा धोरणांमध्ये बदल यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.
- आम्ही सेवा दिल्यावर कोणतीही रक्कम परत केली जाणार नाही, जोपर्यंत काही अपवादात्मक कारणास्तव रिफंड धोरणात नमूद केलं नसेल.
- आमच्या वेबसाईटचा इतर ठिकाणाहून गैरवापर आढळल्यास किंवा शासनाच्या नियमानुसार/मार्गदर्शनानुसार कायद्यात वेळोवेळी बदल झाले तर आम्हाला सेवा थांबवण्याचा अधिकार आहे.